अंबाजोगाई : ‘इनरव्हील’ क्लबकडून एमबीबीएस प्रथम वर्षात आणि 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या 07 गुणवंत व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा म्हणाल्या की, ‘आधार माणुसकीचा’ या सेवाभावी संस्थेने सुचविलेल्या गुणवंत, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणास मदत व्हावी, ह्या उद्देशाने हे साहित्य वाटप करण्यात येत आहे. ज्यामध्ये पुस्तके, रजिस्टर, परीक्षा पॅड व पेन ह्या साहित्याचा समावेश आहे.
ह्या कार्यक्रमाला लागूनच क्लबच्या सदस्या सविता लोमटे, मनीषा झरकर, रेखा शितोळे, सुवर्णा बुरांडे यांचे विविध संघटनेत झालेल्या निवडीसाठी गुलाबाचे रोपटे देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी ‘आधार माणुसकीचा’ संस्थेचे ॲड. संतोष पवार यांनी आपले विचार मांडले. क्लब सदस्या चंद्रकला देशमुख, जयश्री कराड, रेखा तळणीकर, अनिता सुराणा, वर्षा जळकोटे, शिवकन्या पवार, वर्षा देशमुख व आदी सदस्या उपस्थित होत्या. क्लबच्या सचिव मेघना मोहिते यांनी आभार मानले.