अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ.कमलाकर कांबळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती सदस्यपदी निवड झाली. मराठवाड्यातील एक अनुभवी व जेष्ठ प्राचार्य म्हणून डॉ.कांबळे यांची या पदावर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांनी नियुक्ती केली आहे. सदर निवडीचे स्वागत व प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
त्यानिमित्ताने सोमवार, दि.16 सप्टेंबर रोजी खोलेश्वर महाविद्यालयात संस्थेचे स्थानिक पदाधिकारी व कर्मचारीवृंद यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर,कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी ,डॉ.बी. व्ही.मुंडे, प्रा.अजय चौधरी, प्रा.सुहास डबीर, प्रा.डॉ.रवींद्र कुंबेफळकर, प्रा.प्रल्हाद तावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.कांबळे म्हणाले की, संस्थेची पाठराखण,आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि विद्यापीठाने माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळे मला ही संधी मिळाली. मी या संधीचं सोनं करीन. तसेच या माध्यमातून मला विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता येतील. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.अजय डुबे यांनी मानले.