केज नगरपंचायतच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान

प्लास्टिक मुक्तीची घेतली सर्वांनी शपथ

केज : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष आदित्य दादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी सिद्धार्थ नगर येथील अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. कोमल विश्वनाथ गालफाडे हीला आधार माणुसकी संस्था मार्फत आर्थिक मदत देण्यात आली तर न.पं. कर्मचारी यांना केज शहरातील स्वच्छता चांगल्याप्रकारे केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केज नगरपंचायत मध्ये विविध कार्यक्रमांअंतर्गत शहरात दिवसरात्र सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट सफाई कामगार म्हणून आत्माराम हजारे व भामाबाई शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. तर केज येथील सिद्धार्थ नगर येथील भागात वास्तव्यास असलेली व अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलेली कु. कोमल विश्वनाथ गालफाडे हीला आधार माणुसकी या संस्था मार्फत आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर शहरात प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी उपस्थित असलेल्या कर्मचारी नगसेवक यांच्यासह नागरिकांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली. प्लास्टिक स्वतः वापरणार नाही व इतरांना वापरू देणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, उपनगराध्यक्ष दलीलभाई इनामदार, माजी नगराध्यक्ष कबिरोद्दीन इनामदार, मुख्याधिकारी सचिन देशपांडे, नगरसेवक महादेव लांडगे, आधार माणुसकी संस्थेचे संचालक अ‍ॅड.पवार, किसनदादा कदम, बिलाल फारुकी, समीर देशपांडे, प्रेमजित हजारे यांच्यासह बहुसंख्येने प्रतिष्ठित नागरिक व न.पं.चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.