मुंबई : मैं वो मशाल बनूंगी जो हर भारतीय के अंदर आझादी की भूख बन कर देखेगी. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेल्या राष्ट्रभक्तीची आणि देशप्रेमाची भावना व्यक्त करणारा हा अत्यंत प्रभावी संवाद आहे. अशीच भावना मणिकर्णिका नावाच्या एका लहान मुलीने अनुभवली आणि लवकरच ती भारताने आजवर पाहिलेली सर्वात शूर योध्दा राणी बनली. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जिचे वर्णन बंडखोरांमधील पुरुष असे केले होते ती राणी लक्ष्मीबाई ही धैर्य आणि निश्चयीपणाचे प्रतीक बनली होती.
आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले राज्य खालसा करण्याच्या इंग्रजांच्या निर्णयाविरोधात एक स्त्री असूनही जी असामान्य धैर्याने रणांगणावर लढली, अशा राणी लक्ष्मीबाईच्या जीवनाची कथा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटात सादर करण्यात आली आहे. मणिकर्णिका असे बारसे झालेल्या या मुलीचे नाव झाँसीचे संस्थानिक राजा गंगाधर यांच्याशी विवाह झाल्यावर लक्ष्मीबाई असे करण्यात आले. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची मध्यवर्ती भूमिका साकारणार््या अभिनेत्री कंगना राणावत चा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होय. तिच्याबरोबर डॅनी डेंग्झोप्पा, सुरेश ओबेरॉय, जिश्शू सेनगुप्ता, अतुल कुलकर्णी, मोहम्मद झीशान अय्यूब या कलाकारांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका असून अंकिता लोखंडे हिने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. राणी लक्ष्मीबाईच्या या धैर्य आणि शौर्याची कथा सांगणार््या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर शनिवार, 14 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 वाजता ‘झी सिनेमा’ वाहिनीवर प्रसारित केला जाईल.
या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारतानाच त्याच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारलेली अभिनेत्री कंगना राणावत म्हणाली, “मला जेव्हा मणिकर्णिका चित्रपटाची कथा सांगण्यात आली, तेव्हा ती केवळ एक कल्पना होती. पण मी आणि माझ्या टीमने त्या कल्पनेचं रुपांतर एका चित्रपटात केलं . हा एक फारच आव्हानात्मक चित्रपट होता- विशेषत: त्यातील युध्दप्रसंग आणि घोड्यावर बसून दुधारी तलवारींनी खेळलेली लढाई या गोष्टी अवघड होत्या. मी अशा गोष्टी कधी केल्या नव्हत्या. ब्रिटिशांच्या लष्करी ताकदीविरोधात एकाकीपणे लढणार््या एका खर््या योध्दा राणीची भूमिका साकारणं ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिका होती.
या ऐतिहासिक चित्रपटात आठ गाणी असून ती प्रसून जोशी यांनी लिहिली आहेत; तर शंकर-एहसान-लॉय यांनी त्याला संगीत दिले आहे. यातील काही गाण्यांमध्ये मोठा सुरेल वाद्यमेळ ऐकायला येतो, तर काही गाण्यांमध्ये संगीताचा अत्यल्प वापर करण्यात आला आहे. राष्ट्रभक्तीपर चित्रपट असूनही या संगीतकार त्रयीला त्यात अनेकविध भावनांना संगीतबध्द करण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यातील भारत या गाण्यात भावना आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ झाला असून त्यातील प्रसून जोशी यांची “मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रेहना चाहिये” ही ओळ राष्ट्रभक्तीची भावना अचूक सादर करते. यातील विजयी भव, बोलो कब प्रतिकार करोगे, राजाजी, ताक ताकी आणि डंकिला ही गाणीही अतिशय सुरेल असून ती प्रत्येक प्रेक्षकाच्या देशभक्तीची भावना अचूक पकडते.