जिल्हास्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत कन्या शाळेचा संघ प्रथम

अंबाजोगाई : येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत येथील जिल्हा परीषद कन्या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

अंतिम सामन्यात या संघाने गोदावरी बाई कुंकुलोळ कन्या शाळेचा अत्यंत अटीतटीच्या सामन्यात नेत्रदीपक व उत्कृष्ट खेळ करीत पराभव करून प्रथम क्रमांक पटकावीला. यामुळे हिंगोली येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. या संघास तालुका क्रीडा संयोजक व या शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता देवकते यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. संघाच्या यशा बद्दल गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत, मुख्याध्यापक हनुमंत कदम, तालुका क्रिडा संयोजक दत्ता देवकते, केंद्रप्रमुख माणिक साळुंके यांनी अभिनंदन केले आहे.