अंबाजोगाई : माणसांचे आचार-विचार व आहार चांगला असेल तर प्रकृती सदृढ राहू शकते. त्यामुळे आज कालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आरोग्याकडे योग्य लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मानवी जीवनात उत्तम आरोग्य हीच खरी धन-संपत्ती असल्याचे मत डॉ. प्रतापराव टेकाळे यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई बस आगारातील कर्मचारी यांचे आरोग्य सदृढ रहावे या करीता संत गाडगेबाबा सेवा भावी संस्था, जोगाईवाडी अंतर्गत ‘ आधार माणुसकीचा ‘ व स्पार्क्स लाईफ केअर, मुंबई व एस टी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 डिसेंबर रोजी शरीरातील आरोग्याच्या बाबतीतील बदल लक्षात येण्यासाठी विविध प्रकारच्या मोफत चाचणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतापराव टेकाळे ( कान-नाक-घसा तज्ञ) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. किशोर गिरवलकर, प्रा.भागीरथी गिरी, डॉ. देसाई (लाईफ केअर ), डॉ. सोनवणे (लाईफ केअर) ॲड. कल्याण लोमटे, ॲड. प्रिया आगळे, ॲड. अशोक मुंडे, बस आगार प्रमुख, नवनाथ चौरे, ॲड. संतोष पवार, प्रदीप जिरे, विश्वास लवदं आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. किशोर गिरवलकर, प्रा. गिरी मॅडम, डॉ. गोसावी यांनी आरोग्य चांगले रहावे या बाबतीत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ॲड. संतोष पवार यांनी केले तर सूत्रसंचालन केंद्रे मॅडम यांनी तर आभार नवनाथ चौरे यांनी मानले.
105 कर्मचाऱ्यांनी करून घेतली आरोग्य तपासणी
आरोग्य शिबीरात डाय बेटीज / रक्त- दाब / एच.आय.व्ही / नाडी-परिक्षण /बी. एम.आय. व बॉडी फॅट/ भोजन सल्ला या चाचण्या मोफत होत्या. तसेच संपूर्ण बॉडी स्कॅनिगं व ब्लड टेस्ट अल्प-दरात व ती तपासणी ऐच्छिक होती.