मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ; पत्रकार परिषदेत आवाहन
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूद्द व महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास 5% आरक्षण द्यावे याप्रश्नी भव्य मोचाचे आयोजन मंगळवार,दि.17 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. सदर मोर्चा अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली येथुन निघुन पाटील चौक-सावरकर चौक-बस स्टँन्ड-शिवाजी चौक मार्गाने निघुन तो उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून सदर ठिकाणी मोर्चाचे रुपांतर हे धरणे आंदोलनामध्ये होईल, त्यानंतर मोर्चाची सांगता होईल. अशी माहिती शासकीय विश्रामगृहात आयोजित पञकार परिषदेत देण्यात आली. या मोर्चात नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
या संदर्भात रविवार,दि. 15 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. गवळी आय. ए.,शेख रमीज सर, पठाण जहाँगीर मिरखान, पठाणे अकबर खान, पठाण रिजवान खान, सादेक शाह, शेख मुकरम, सरफराज खान, पठाण अनीस खान यांनी यावेळी दिलेली माहिती अशी की, भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वाच्या धार्मिक आधारावर दिले जाणारे नागरीकत्वाच्या (CAB) चे विरुद्ध तसेच आगामी काळात भारतात काळा कायदा (NRC) धोरणांविरूद्ध व महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजास 5% आरक्षण मिळावे याकरीता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजास सच्चर आयोग, महेमदु रहेमान समिती व कुंडू आयोगाच्या शिफारशी आणि मा.उच्च न्यायालच मुंबई,या न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.