केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी
अंबाजोगाई : भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूद्द व महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास 5% आरक्षण द्यावे याप्रश्नी भव्य मोचाचे आयोजन आज दि.१७ डिसेंबर१९ रोजी दुपारी २:३० वाजता करण्यात आले. हा मोर्चा अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली येथुन निघुन पाटील चौक-सावरकर चौक-शिवाजी चौक मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी मोर्चेकरांनी हातात फलक, काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. हा मोर्चा अगदी शांततेत निघाला. यावेळी मोर्चेकरांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया मार्फत राज्यपालांना मागण्याचे निवेदन दिले. मोर्चाचे आयोजन अंबाजोगाईतील भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.