राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत संकल्प गुराला प्रथम ; गौरव रेगे द्वितीय व वसीम शेख तृतीय

अंबाजोगाई : माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबाजोगाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत चंद्रपूरच्या संकल्प गुराला याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नागपूरच्या गौरव रेगे याने द्वितीय, पुण्याच्या वसीम शेखने तृतीय, ठाण्याच्या सुयोग लोखंडेला चतुर्थ पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकी साडेसात हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक ऋषीकेश होले ( नाशिक ), सिद्धांत राऊत ( मुंबई ), आशिष पंडित ( पुणे ), ऋषभ जैन ( अमरावती ) यांना देण्यात आले.

सोमवारी दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, डॉ. अनिल भुतडा, प्रविण पाटील, मंगेश निपाणीकर, डॉ. नितीन पोतदार, डॉ. धर्मपात्रे, स. पोलिस निरीक्षक दहिफळे, डॉ. नरेंद्र काळे, एस.के. निर्मळे, प्रशांत बर्दापूरकर, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बॅडमिंटनचा अंतिम सामना संकल्प गुराला व गौरव रेगे यांच्यात चुरशीचा झाला. पहिला सामना संकल्पने तर दुसरा सामना गौरवने जिंकला. अंतिम लढत अटीतटीची झाली. त्यात संकल्प गुराला प्रथम क्रमांकाचे पस्तीस हजार रुपये रोख व मोठी ट्रॉफी पटकावली. गौरव रेगेला द्वितीय क्रमांकाचे पंचेवीस हजार रुपये रोख आणि मोठी ट्रॉफी मिळाली. पुण्याच्या वासिम शेखला तृतीय क्रमांकाचे पंधरा हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. चौथे पारितोषिक ठाणे येथील सुयोग लोखंडे यास अकरा हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून नरेश गुंडले, आकाश पवार, संकेत सोमवंशी, प्रा .पी.पी. दिग्रसकर, कैलास शेटे, वसंत कांबळे, संजय आरसुडे यांनी काम पाहिले.

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी रणजित लोमटे, प्रविण देशमुख, रवि देशमुख, महेश लोमटे, शरद लोमटे, अनंत मसने, कैलास शेटे, तुषार जोशी, प्रा.डॉ. दिग्रसकर, संजय आरसुडे, वसंत कांबळे, विजय पवार,किरण सेलमोहकर, हौशी बॅडमिंटन संघ मंडळाचे सभासद यांनी पुढाकार घेतला.