अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती /जमाती /विजा. भजा /इ .मा.व /वि.मा.प्र शासकीय /निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रमाकांत सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सध्या संघटनेचे जाळे बांधण्याचे काम वेगात सुरू आहे.
संघटनेतर्फे विविध ठिकाणी नवीन सभासद व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या देखील चालू आहेत. नुकतीच दि १४ डिसेंबर रोजी संघटनेची बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख सभासद व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. सदर बैठक संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रमेश गायसमुद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या विविध प्रकारच्या विषयांवर व पदाधिकारी निवडीसाठी सांगोपांग चर्चा झाली. बैठकीच्या विचार विनिमयातून अंबाजोगाई तालुकाध्यक्ष पदी अंबाजोगाई नगर परिषदेचे कर्मचारी रमाकांत सोनकांबळे यांची नियुक्ती करण्याचे सर्वानुमते ठरले.
सोनकांबळे यांना बैठकीतच जिल्हाध्यक्ष यांच्याकडुन नियुक्ती पत्र देण्यात आले. रमाकांत सोनकांबळे यांना संघटनेचे कर्मचारी व त्यांना येणाऱ्या सेवांविषयक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावेत असे आवाहन करण्यात आले. रमाकांत सोनकांबळे यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक तथा राजकीय संघटनांकडून तसेच मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन केल्या जात आहे. तथा त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आहेत.