खोलेश्वरची साक्षी करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत साक्षी थाटकरला दोन पारितोषिके

अंबाजोगाई : येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कु. साक्षी भास्करराव थाटकर हिने सातारा येथे झालेल्या शासकीय राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत लांब उडीमध्ये महाराष्ट्रात द्वितीय व हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक पटकाऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

कु.साक्षी थाटकर हिने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मुलींच्या बाल गटात लांब उडीत द्वितीय तर हर्डल्समध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तिची निवड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. तिला विद्यालयातील क्रीडा शिक्षक विजय बेंडसुरे व शाम वारकड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

साक्षीने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाशिक्षकांचे भा.शि.प्र. संस्थेचे डॉ. सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह नितीन शेटे, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड. किशोर गिरवलकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपीन दादा क्षीरसागर शालेय समिती अध्यक्ष प्रा. शशिकांत टेकाळे, मुख्याध्यापिका धर्मपात्रे, राजकुमार वखरे, पर्यवेक्षक अरूण पत्की, विभाग प्रमुख प्रशांत पिंपळे यांच्यासह सर्वांनी कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.