अंबाजोगाई : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत न्यू व्हिजन पब्लिक स्कूल मध्ये बुधवार,दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त श्रमदान करून जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून प्रा. वसंतराव चव्हाण,विनायक मुंजे हे उपस्थित होते. प्रारंभी
अतिथींच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेच्या संगीत संचाने ‘वैष्णव जन तो’ हे सुप्रसिद्ध भजन सादर करून सर्वांची दाद मिळवली. शाळेतील आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी परिपाठ सादर केला. यावेळी शाळेच्या परिसरात विद्यार्थी व शिक्षकांनी जयंतीनिमित्त श्रमदान व परिसर स्वच्छता केली.अभिषेक मुंडे याने महात्मा गांधी व स्वराज हंडीबाग याने लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभूषा साकारल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया सोनवणे व शिवांगी कदम यांनी केले. सुविचार वाचन ईशा हिने केले तर बातमीपत्र वाचन दिया तोष्णिवाल हिने केले. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे विषयीची माहिती रोशनी, दिया, ईशा यांनी सांगीतली तर प्रश्नमंजूषा अनुराग व सार्थक यांनी घेतली. विद्यार्थी यांना अश्विनी जोशी, अमोल थोरात, महामुनी, मिनाक्षी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, डॉ. डी. एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी, संचालक संकेत मोदी, प्रा. एस. ए. बिराजदार, प्राचार्य रोशन पी. नायर यांनी सर्व विद्यार्थीनी व विद्यार्थी यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.