केज येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा उमेदवारी अर्ज आज दि. ३ ऑक्टोबर रोजी मोठे शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात आला. यावेळी मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती.
केज येथील धारूर चौकातून वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे स्वागत स्वागत करण्यात येत होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप उपस्थितांना संबोधित करून करण्यात आला. यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षासह घटक पक्षातील नेते मंडळीची उपस्थिती होती. दरम्यान रॅलीतील घोषणांनी केज शहर दणाणून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, राजेसाहेब देशमुख,नगराध्यक्षा रचना मोदी, विलास सोनवणे, नगरसेवक बबन लोमटे, नगरसेविका संगीता व्यव्हारे, डॉ. नरेंद्र काळे, राहूल सोनवणे, कुलदीप करपे, अंजली पाटील यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदार संघातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.