सुयश पुरीची बुद्धीबळ स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड

अंबाजोगाई : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत न्यु व्हिजन पब्लिकचे विद्यार्थी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धेत उज्वल कामगिरी करीत आहेत. तालुका,जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर आयोजित स्पर्धेत न्यु व्हिजनच्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी अनेक पारितोषिक पटकावली आहेत. संस्थेचा विद्यार्थी सुयश शशिकांत पुरी (इयत्ता 8 वी) याने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व घवघवीत यश संपादन केले.

बुधवार,दि.18 सप्टेंबर रोजी जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धा पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, परळी येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये संस्थेच्या सुयशने बीड जिल्हा व अंबाजोगाई तालुक्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पटकावला. सुयशला न्यु व्हिजनचे क्रिडाशिक्षक शशांक साहु व विष्णु मुंडे आणि मार्गदर्शक मनोज आडे यांचे मार्गदर्शन लाभले. विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल सुयश पुरीचे संस्थेचे राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ. बी. आय.खडकभावी, डॉ. डी.एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, शाळेचे प्राचार्य रोशन पी.नायर आदींनी अभिनंदन केले आहे.