कबड्डी स्पर्धेत न्यु व्हिजन पब्लिक स्कुलचे यश

अंबाजोगाई : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या कबड्डी संघाने सी.बी.एस.ई. क्लस्टर आंतरशालेय कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय स्थान मिळवले आहे. आर्या पब्लीक स्कुल, पिंपळनेर(जि.सोलापुर) येथे दि.13 ते 15 सप्टेंबर 2019 या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील एकुण 52 संघ सहभागी झाले होते. न्यु व्हिजनचा संघाला 17 वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वतृतीय स्थान प्राप्त झाले आहे.

पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह,संघातील खेळाडूंना प्रमाणपत्र असे आहे. विजयी संघाला न्यु व्हिजनचे क्रिडाशिक्षक शशांक साहु व विष्णु मुंडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, डॉ.डी.एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, शाळेचे प्राचार्य रोशन पी.नायर आदींनी अभिनंदन केले आहे.