मिरवणूकीत नाचताना ऱ्हदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात गणपतीच्या मिरवणूकीत नाचताना ऱ्हदयविकाराचा झटका आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. श्याम महादेव गोंडे ( वय 36 ) असे त्यांचे नाव असुन सदरिल घटना रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे रविवार पेठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी शहरातील रविवार पेठ भागातील पटाईत गल्ली या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापणा करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत नाचताना श्याम गोंडे यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर तरूणांनी त्यांना तात्काळ स्वा.रा.ती. रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे.