‘अंबाजोगाई मिरर’ च्या बातमीची दखल : अंबाजोगाई ‘एमआयडीसी’ चा मुद्दा विधानसभेत, वाचा…!

आमदार नमिता मुंदडा यांनी ठोस भूमिका घ्यावी…!

टीम AM : केज मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘एमआयडीसी’ च्या प्रश्नाकडे ‘अंबाजोगाई मिरर’ ने लक्ष वेधले होते. या बातमीची दखल घेत आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला असून त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.

केज मतदारसंघासाठी अंबाजोगाई ‘एमआयडीसी’ उभारणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बीड जिल्ह्यात अलीकडे दोन ‘एमआयडीसीं’ ना मंजुरी मिळालेली असताना केज मतदारसंघाला अद्यापही अशी संधी मिळालेली नाही, ही बाब स्थानिकांसाठी चिंतेची मानली जात आहे.

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ‘एमआयडीसी’ अत्यंत महत्त्वाची असून यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ अधिवेशनात मांडून थांबविण्याऐवजी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी या विषयावर ठोस भूमिका घेत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून अंबाजोगाईसाठी ‘एमआयडीसी’ मंजूर करून आणावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लागल्यास केज मतदारसंघाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला निश्चितच मोठी चालना मिळेल, असे मतही व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here