विद्यार्थ्यांसोबत जेवण, मनमोकळा संवाद : जिल्हाधिकाऱ्यांची अनोखी भेट…!

टीम AM : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज दिनांक 6 आक्टोंबर ‌रोजी अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, डिघोळआंबा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत, आवडी – निवडी तसेच भविष्यातील ध्येयांबाबत जाणून घेतले.

विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, त्यांनी विद्यार्थ्यांसोबत दुपारचे जेवण घेत आपुलकीने संवाद साधला. जिल्हाधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला हा स्नेहाचा क्षण विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here