मुंबईतील ‘FDA’ कारवाईची थेट अमेरिकेत चर्चा : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत…!

टीम AM : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त ‘आयएएस’ तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेसाठी सुरू केलेल्या कठोर मोहिमेची थेट अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ ने दखल घेतली आहे. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर सुरू असलेल्या ‘FDA’ च्या कारवाईवर ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ ने विशेष वृत्त प्रसिद्ध केले असून, त्यात तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ च्या वृत्तात तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या कारवाईमुळे मुंबईतील रेस्टॉरंट क्षेत्रात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. एका अन्नसुरक्षा अधिकाऱ्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेणे, ही या मोहिमेतील महत्त्वाची बाब ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here