दुष्काळाची दाहकता : अंबाजोगाईतील सीताफळ संशोधन केंद्रातील झाडे पाण्याअभावी वाळू लागली…!

टीम AM : अंबाजोगाईत यंदाच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. पाण्याअभावी शेती आणि पिकांचे नुकसान होत असतानाच आता अंबाजोगाईतील कृषी महाविद्यालय परिसरात असलेल्या सीताफळ संशोधन केंद्रालाही दुष्काळाचा फटका बसू लागला आहे. या केंद्रातील सीताफळाची झाडे पाण्याअभावी वाळू लागल्याचे चित्र समोर आले आहे.

सीताफळाच्या संशोधन आणि संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्रातील झाडांची अवस्था बिकट होत आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने झाडांना आवश्यक ओलावा मिळत नसून अनेक झाडे सुकलेली आहेत. संशोधनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या झाडांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकीकडे सीताफळ संशोधन आणि उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे पाण्याअभावी संशोधन केंद्रातील झाडेच वाळू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ प्रशासनाने आणि कृषी विभागाने तातडीने लक्ष घालून झाडांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here