दर्शनावरून परतताना काळाचा घाला : महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी…!

टीम AM : राजस्थानमधील कोटा – उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात खाटू श्यामजी यांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू झाला असून, 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात व्हॅनचा चक्काचूर झाला असून, घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवले.

नेमके काय घडले ?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भाविक खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना कोटा – उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांच्या क्रूझर व्हॅनची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि 9 जणांचा मृत्यू झाला.

जखमींवर उपचार ; मृतदेह कोटा मेडिकल कॉलेजमध्ये

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या 8 जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अपघाताच्या कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here