मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत ”रास्ता रोको” : वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा…!

टीम AM  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज, मंगळवारी अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनामुळे यशवंतराव चव्हाण चौक परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. मंगळवार हा अंबाजोगाईचा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरात आधीच मोठी वर्दळ होती. त्यातच रास्ता रोको आंदोलन झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here