अंबाजोगाईत दिवसभरात दोन आत्महत्या ; 22 वर्षीय युवकासह वकीलाचा मृत्यू…!

टीम AM : अंबाजोगाई शहरात दिवसभरात आत्महत्येच्या दोन घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास असलेल्या 22 वर्षीय युवकासह ॲड. एल. एम. दामा यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पहिल्या घटनेत अंबाजोगाई शहरातील विवेकानंद नगर, नागझरी परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या आदित्य आंगद गुंजकर (वय – 22 वर्षे) या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आदित्य हा मूळचा नरवाडी, ता. सोनपेठ येथील रहिवासी असल्याचे समजते. घटनेनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात नेण्यात आला.

दुसऱ्या घटनेत अंबाजोगाई येथील ॲड. एल. एम. दामा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दोन्ही घटनांमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनांचा सविस्तर तपशील स्पष्ट होणार आहे. अंबाजोगाई पोलीस घटनेचा अधिक तपास करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here