अंबाजोगाईत युवकाची आत्महत्या ; परिसरात खळबळ…!

टीम AM : अंबाजोगाई शहरातील विवेकानंद नगर, नागझरी परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या आदित्य आंगद गुंजकर (वय – 22 वर्षे) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

आदित्य गुंजकर हा मूळचा नरवाडी, ता. सोनपेठ येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here