कृष्णा – गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचा शोध : ऑइल इंडिया लिमिटेडला यश…!

टीम AM : सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेडला कृष्णा – गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. समुद्राच्या उथळ पाण्यात असलेल्या एका ब्लॉकमध्ये ही शोधमोहीम यशस्वी झाली असून, प्राथमिक चाचण्यांदरम्यान दररोज सुमारे दोन लाख स्टँडर्ड क्युबिक मीटर (SCMD) नैसर्गिक वायूचा प्रवाह नोंदवण्यात आला आहे. 

या विहिरीतून दररोज सुमारे 170 बॅरल कंडेन्सेट मिळत असल्याची माहितीही समोर आली आहे. या शोधामुळे भारताचे देशांतर्गत नैसर्गिक वायू उत्पादन वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ऑइल इंडिया लिमिटेडला कृष्णा – गोदावरी खोऱ्यातील मत्स्यपुरी फॉर्मेशनमध्ये नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. हा शोध KG -DSF/GSKW/2028 या ब्लॉकमधील गोदावरी‌ – 1 विहिरीत लागला आहे. कंपनीने हा ब्लॉक डिस्कव्हर्ड स्मॉल फील्ड्स (DSF) या बोली प्रक्रियेद्वारे मिळवला होता. या क्षेत्रात यापूर्वी तपासणी न झालेल्या ठिकाणी वायूचा साठा आढळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या शोधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here