खळबळजनक : आमदार रोहित पवारांच्या PA च्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला  

टीम AM : बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल झाले आहेत.

साईनगर भागात मुलीचा मृतदेह मिळून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. हा प्रकार हत्या आहे की मुलीने स्वतःचे जीवन संपवले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here