टीम AM : धानोरा खुर्द परिसरातील आठ गावांसाठी अडीच महिन्यांपासून बंद असलेली ‘एसटी’ बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. या प्रश्नाबाबत ‘अंबाजोगाई मिरर’ नेही या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. अखेर रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाल्यानंतर बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्या सूचनेनुसार रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आणि बस सेवा सुरू झाली.
बस सेवा सुरू होताच धानोरा खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी बस चालक – वाहकांचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच आमदार नमिता मुंदडा, आगार प्रमुख व संबंधित प्रशासनाचे आभार मानले. यावेळी भाजपचे हिंदूलाल काकडे, दिलीप देशमुख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.



