‘जंतरमंतर’ चे पडसाद अंबाजोगाईत : धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे दहन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचा आंदोलनात्मक इशारा

टीम AM :दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अंबाजोगाईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि संबंधित जबाबदारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या आणि सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ तात्काळ थांबवण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घेत योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे, अरुण बनसोडे, बादल तरकसे, गणेश उपाडे, शंकर उजगरे, नितीन गोदाम, बालासाहेब शेवाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here