टीम AM : नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन मुलांसह पुलावरून गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या आमदुरा पुलाजवळ आज शुक्रवारी सकाळी ही मन हेलावणारी घटना घडली.
धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापुर्वी व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुलासह आत्महत्या करीत आहे, असं स्टेट्स ठेवलं. सुमित मोरे, मुलगा आणि मुलगी असं मृत पावलेल्यांची नावं आहेत. शिक्षकानं मुलांसह आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोण आहेत सुनिल मोरे ?
मृतक सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील टेंडर गावचे रहिवासी असून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षकपदी कार्यरत होते. मागील काही वर्षापासून ते पत्नी आणि दोन मुलांसह सांगवी गोपाळनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. आज सकाळी दोन्ही मुलांना कारमध्ये बसून ‘शाळेत सोडतो’ म्हणून घरून निघाले. सकाळी सात वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील पुणे गाव परिसरातील आमदुरा घाटावरुन गोदावरी नदीपात्रात गाडी टाकून चिमुकल्यांसह त्यांनी जीवनयात्रा संपवलीयं. या घटनेनं शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.



