प्रेरणादायी : 21 वर्षीय साहिबाने वाचवले 5 हजारांहून अधिक साप…!

टीम AM : अवघ्या 21 वर्षीय साहिबा हिने आतापर्यंत 5 हजारांहून अधिक सापांचे यशस्वी रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडले आहे. लहानपणापासून प्राण्यांविषयी असलेले प्रेम तिला सर्पमित्र बनण्यापर्यंत घेऊन आले.

प्रत्येक कॉलला प्रतिसाद देत ती सापांना सुरक्षितपणे पकडून जंगलात किंवा योग्य ठिकाणी सोडते. साहिबा केवळ सापांचे रेस्क्यू करत नाही, तर जनजागृतीही करते. प्रत्येक साप विषारी नसतो आणि भीतीऐवजी योग्य माहिती असणे गरजेचे आहे, असा संदेश ती नागरिकांना देते. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी तिचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here