टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (स्वाराती), अंबाजोगाई येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव तसेच डॉ. नागेश अब्दागिरे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक यांनी जारी केले आहेत.
प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे ‘स्वाराती’ च्या प्रशासनात महत्त्वाचा बदल होणार आहे. बदलीचे आदेश जारी केल्यानंतर ‘स्वाराती’ च्या वैद्यकीय व प्रशासकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



