शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी : सरकारचा निर्णय

टीम AM  : पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा चर्चेत आला. राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले.

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री झिरवळ यांनी हा निर्णय जाहीर केला. पाचपुते यांनी सभागृहात हे एनर्जी ड्रिंक लहान मुले व गरोदर महिलांसाठी अपायकारक असल्याची सूचना बाटलीवर असूनही त्याची खुलेआम विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हेही विधानभवनात उपस्थित होते. राज्यभरात भेसळयुक्त दूध, प्रतिबंधित गुटखा तसेच शाळा परिसरातील अंमली पदार्थांच्या छुप्या विक्रीविरोधात ‘एफडीए’ कडून तपासणी आणि विशेष मोहीम सुरू असल्याची माहिती मंत्री झिरवळ यांनी सभागृहात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here