मोकाट श्वानांच्या हल्ल्यात जखमी सहा वर्षीय बालकाचा मृत्यू : अंबाजोगाईत हळहळ…!

टीम AM : अंबाजोगाई शहरातील रोशन कॉलनी परिसरात मोकाट श्वानांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फरहान आस मोहम्मद कुरेशी असे मृत बालकाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी मोकाट श्वानांनी फरहान याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्याच्यावर अंबाजोगाई तसेच लातूर येथे उपचार करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने रोशन कॉलनीसह संपूर्ण अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील विविध भागांत मोकाट श्वानांचा वावर वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर तरी अंबाजोगाई तालुका प्रशासन व नगरपरिषद मोकाट श्वानांवर ठोस उपाययोजना करणार का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मोकाट श्वानांच्या समस्येवर केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार ? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here