विद्यार्थिनींची बातमी ठरली प्रभावी : शिक्षकाची झाली नियुक्ती…!

टीम AM : बीड जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी (केंद्र जरूड), ता. बीड येथील विद्यार्थिनींच्या ‘बॉटल माईक’ सोशल मीडिया रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने दखल घेतली. 

गणित, विज्ञान आणि संगणक या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचा माईक बनवून वर्गातूनच अभिरूप बातमीपत्र सादर केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गांभीर्याने दखल घेत बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती केली असून ते शाळेत रुजू झाले आहेत. 

विद्यार्थिनींच्या मागणीला प्रशासनाने दिलेल्या या तातडीच्या प्रतिसादामुळे त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here