विठुरायाच्या भेटीसाठी ‘एसटी’ सज्ज : आषाढी यात्रेसाठी 5500 विशेष बसेस…!

टीम AM : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा 5, 500 विशेष ‘एसटी’ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून, जवळच्या ‘एसटी’ आगारात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वारी सेवेत कार्यरत चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 13 हजार कर्मचारी याचा लाभ घेणार आहेत. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून ‘एसटी’ यंत्रणा यात्राकाळात अहोरात्र सेवेसाठी सज्ज राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here