बीड जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात : शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

टीम AM  : ‘अल निनो’ चा प्रभाव आणि लांबलेल्या पावसाळ्यामुळे वातावरणात मोठे बदल होत असून जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बीड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा मंगळवार दि. 23 जून 2026 पासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यानुसार शाळांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12.30 अशी राहणार आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून अधिनस्त सर्व शाळांना सूचना देण्यासह केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here