नगरसेवकांसाठी महत्त्वाची बातमी : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, वाचा…!

टीम AM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नगरसेवकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या उमेदवारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. नेमका कोणता निर्णय मंजूर करण्यात आला आहे.? जाणून घेऊयात…!

सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ‌ देण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here