प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांना दिलासा : नियुक्तीस मंजुरी कायम, वाचा…!

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी ‘एमबीई’ सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या नियुक्तीस मंजुरी कायम ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या 29 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानंतर विद्यापीठाचे कुलगुरू यांनी 7 मे 2026 रोजी यास मान्यता दिली. त्यानुसार डॉ. खडकभावी हे वयाच्या अधिवर्षता मर्यादेपर्यंत म्हणजेच 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्राचार्य पदावर कार्यरत राहणार आहेत.

विद्यापीठाच्या संलग्नता विभागाकडून 8 मे 2026 रोजी याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले. या पत्रात प्राचार्य पदाच्या सेवाशर्ती, विद्यापीठाचे अधिनियम, नियम व ‘यूजीसी’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, पात्रता किंवा कागदपत्रांबाबत कोणतीही त्रुटी अथवा आक्षेप आढळल्यास विद्यापीठाला मंजुरी मागे घेण्याचा अधिकार राहणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्राचार्य ‌डाॅ. बी. आय. खडकभावी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here