टीम AM : फिल्म इंडस्ट्रीला राम राम करुन राजकारणात प्रवेश केलेले ‘थलापती विजय’ हे तामिळनाडूचा इतिहास पालटणार आहेत. तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये, विजय यांच्या ‘TVK’ या पक्षाने मोठी आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. विजय यांच्या अवघ्या दोन वर्षे जुन्या पक्षाच्या या कामगिरीने DMK आणि AIADMK या पक्षांचे पायाच हादरवून टाकला आहे. यावेळी, थलपती विजय यांच्या पहिल्याच निवडणुकीतील विजयाने, गेल्या 60 वर्षांपासून तमिळनाडूवर वर्चस्व गाजवणाऱ्या AIADMK आणि DMK या दोन प्रमुख पक्षांच्या ‘घराणेशाही’ ला थेट आव्हान दिले आहे. मात्र, आता सत्तेवरील त्यांची पकड कमकुवत झाली आहे. या दोन्ही पक्षांनी गेल्या जवळपास सहा दशकांपासून आलटून – पालटून राज्याचा कारभार पाहिला. पण आता थलापती विजय या राज्याचा कारभार सांक्षाळण्यास सज्ज झाला आहे. पण विजय थलापतीचा हा प्रवास तितकासा सोप्पा नव्हता.
बालकलाकार म्हणून केले काम
विजयचा चित्रपटसृष्टीशी असलेला संबंध काही नवीन नाही. तो अगदी लहानपणापासूनच फिल्मी वातावरणात वाढला आहे. त्याचे वडील, एस.ए. चंद्रशेखर, हे तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. विजयने अगदी लहान वयातच कॅमेऱ्यासमोर कसे जायचे हे शिकले होते. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात 1984 मध्ये, त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या वेट्री या चित्रपटाद्वारे झाली. त्यानंतर, 1992 मध्ये त्यानीं नालैया थीरपू (Naalaiya Theerpu) या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले; या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याच्या वडिलांनीच केले होते.
घरच सोडून दिले
मात्र, एक काळ असा होता जेव्हा विजयच्या वडिलांनी त्याला फिल्म इंडस्ट्रीत येण्यास चक्क मनाई केली होती. विजयला अभिनेता व्हायचे होते. त्याने त्याची ही इच्छा त्याच्या वडिलांकडे व्यक्त केली. पण त्यांची ही इच्छा त्यांच्या वडिलांनी मात्र अमान्य केली. त्यांनी अभिनेत्याला हिरो बनण्यास पाठिंबा दिला नाही. या नकाराने विजय इतके दुखावले गेले की त्यांनी घरच सोडून दिले. एका मुलाखतीत खुद्द विजयनेच हा किस्सा सांगितला होता की, रागाच्या भरात ते चेन्नई येथील ‘उदयन थिएटर’च्या दिशेने निघाले होते. घर सोडताना, त्यांने तिथे एक चिठ्ठीही ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी कोणीही आपला शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती केली होती.
कुटुंबाला वाटू लागली काळजी
त्यावेळी विजयला खरंतर एक सिनेमा पाहून घरी जायचे होते. पण जेव्हा तो रात्री उशिरापर्यंतही घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबाला काळजी वाटू लागली. त्याचे वडील, एस.ए. चंद्रशेखर, आपल्या मुलाच्या शोधात स्वतः त्या थिएटरमध्ये गेले. तिथे, थिएटरच्या वॉचमनने त्यांना सांगितले की, विजय थिएटरमध्येच उपस्थित आहे. त्यानंतर, चंद्रशेखर यांनी विजयची समजूत घातली आणि त्याला घरी परत घेऊन आले. पुढे, एका वडिलांनीही एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.



