शिवाजी राजं म्हणायचं…! सलमान खानच्या डायलॉगवर चाहते फिदा…!  वाचा…!

टीम AM : रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा असून, अभिनेता सलमान खानच्या विशेष भूमिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाच्या एका अत्यंत जोशपूर्ण दृश्यात, शत्रूच्या गळ्यावर तलवार रोखून धरलेला सलमान खान, “शिवाजी नाही, ‘शिवाजी राजं’ म्हणायचं !” हा संवाद प्रभावीपणे मांडताना दिसतो. या संवादामुळे चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट होत आहे. 

या भूमिकेसाठी सलमान खानने भगवा कुर्ता, फेटा आणि हातात तलवार घेतलेला मराठ्यांचा लूक परिधान केला असून तो अत्यंत रुबाबदार दिसत आहे. सलमान खान या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत शिलेदार ‘जीवा महाला’ यांची भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे. 

रितेश देशमुखने खुलासा केला की, त्याने सलमानला ही भूमिका ऑफर केली नव्हती, तर खुद्द सलमाननेच या चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली होती. “तू माझ्याशिवाय हा चित्रपट बनवूच शकत नाहीस, या चित्रपटात माझा सहभाग असायलाच हवा,” असे म्हणत सलमानने या ऐतिहासिक प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा आग्रह धरला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here