अंबाजोगाईत ‘शक्तीपीठ’ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग : 8 गावांतील मोजणी प्रक्रिया पूर्ण

​टीम AM : बीड जिल्ह्यात नागपूर – गोवा ‘शक्तीपीठ’ महामार्गाचे काम आता निर्णायक टप्प्यावर आले असून परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील 14 पैकी 8 गावांमधील जमीन मोजणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकल्पाचा स्वतः आढावा घेऊन उर्वरित 6 गावांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

आतापर्यंत अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली बावणे, गिरवली आपेट, वरवटी, पिंपळा धायगुडा आणि सायगाव या 5 गावांमधील 119 हेक्टर, तर परळीतील कन्हेरवाडी, दाबी आणि भोपळा या 3 गावांमधील 68 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. 

हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक आणि धार्मिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मोजणी दरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here