टीम AM : देशात 2027 च्या जनगणनेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला टप्पा उद्या म्हणजे 1 एप्रिलपासून सुरू होणार असून तो येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार यांनी दिली आहे. याआधीची जनगणना 2011 मध्ये झाली होती.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा यांची माहिती घेतली जाणार आहे. यावेळी नागरिकांना प्रथमच स्व – गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, विशेष मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून घरी बसून माहिती भरता येणार आहे. हे पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल.
माहिती भरल्यानंतर नागरिकांना 11 अंकी ‘AC ID’ दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक माहिती संकलित केली जाणार असून, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. दुस-या टप्प्यात जातीनिहाय गणनाही केली जाणार आहे.



