धक्कादायक : तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या ; अंबाजोगाईत खळबळ

टीम AM : अंबाजोगाई शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पठाण मांडवा रोड परिसरात एका अज्ञात महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, मृत महिलेची ओळख पटली ‌असून वैशाली सुनिल चिकटकर असं सदरिल महिलेचे नाव आहे. मूळच्या जवळगाव येथील रहिवासी असलेल्या वैशाली मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईत भाड्याने रहात होत्या. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here