विजय सेतुपतीच्या ‘काट्टान’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित, एकदा पहाचं…!

टीम AM : विजय सेतुपती यांची तमिळ वेब सिरीज ‘काट्टान’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो अतिशय थरारक आणि अंगावर काटा आणणारा आहे. ही एक अ‍ॅक्शन – ड्रामा आणि मिस्ट्री थ्रिलर सिरीज आहे. ट्रेलरमध्ये हसणारे एक कापलेले शीर दिसते, ज्यामुळे कथा अधिक रहस्यमय वाटते. ही कथा मुथु नावाच्या पात्राभोवती फिरते. त्याचे कापलेले शीर स्वतःचे शरीर शोधण्यासाठी गावकऱ्यांची मदत घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘काट्टान’ चा टीझर प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला आहे. ट्रेलरमध्ये एका छोट्या शहराची कथा दाखवली आहे, जिथे पोलिस ठाणे बंद होण्याच्या मार्गावर आहे, कारण तिथे कोणतेही गुन्हे दाखल होत नाहीत. दिवसेंदिवस प्रकरणांची संख्या कमी होत चालली आहे. अशातच जंगलात एक कापलेले डोके सापडते आणि त्यानंतर तपास सुरू होतो.

लोकांकडून चौकशी केली असता त्या व्यक्तीबद्दल वेगवेगळ्या कथा समोर येतात. काही जण त्याच्या कौशल्याचे कौतुक करतात, तर काही म्हणतात की तो तस्करीच्या टोळीत काम करत होता. काहींच्या मते तो नृत्य मंडळीतही काम करत होता, तर कधी घड्याळ दुरुस्ती करणारा मेकॅनिक म्हणूनही काम करत होता. या मालिकेत या व्यक्तीची खरी कहाणी उलगडत जाणार आहे. ‘काट्टान’ ही वेब सिरीज 27 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म JioHotstar वर प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज तमिळसह हिंदी, मल्याळम, तेलुगू, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here