टीम AM : अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हर्ष संतोष लखेरा (वय अंदाजे 21 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष लखेरा याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.



