‘शक्तीपीठ’ महामार्ग अंबाजोगाई – परळी तालुक्यातील ‘या’ गावातून जाणार : रोजगाराच्या संधींना एक नवी दिशा मिळणार, वाचा…! 

टीम AM : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणारा ‘शक्तीपीठ’ महामार्ग हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारही प्रमुख विभागांतील सुमारे 371 गावांना स्पर्श करणारा हा महामार्ग, या भागांच्या प्रादेशिक विकासाला  आणि रोजगाराच्या संधींना एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.

या बहुप्रतिक्षित प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणापोटी, बाधित शेतकऱ्यांना नियमांनुसार बाजारभावापेक्षा अनेक पटीने अधिक अशी मोठी भरपाई मिळणार आहे. यामुळे, हा महामार्ग केवळ दळणवळणाची सोय वाढवणार नाही, तर या 371 गावांतील शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचे नवे पर्व घेऊन येणार आहे.

‘शक्तीपीठ’ महामार्गाच्या अंमलबजावणीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जमीन संपादन. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या जमीन संपादन नियमांनुसार भरपाई दिली जाईल.

‘या’ गावातून जाणार महामार्ग

  • बीड : वरवटी, पिंपळा धायगुडा, गिरवली आपटे, गिरवली बावणे, गीता, भारज, सायगाव, नांदगाव इंजेगाव, कौठळी, तळेगाव, डाबी, कन्हेरवाडी, भोपळा आणि इतर गावांचा यात समावेश आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here