टीम AM : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणुकीचा प्रचार शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावा, यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केला आहे.
बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी आणि अंबाजोगाई नगरपरिषद क्षेत्रात तसेच लगतच्या ग्रामीण भागात खाजगी किंवा सार्वजनिक जागेवर झेंडे, कापडी फलक, भित्तीपत्रके लावणे किंवा घोषणा लिहिणे संबंधीत जागामालक व परवाना प्राधिकरणाची पूर्वपरवानगी शिवाय करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत हा आदेश देण्यात आला असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो लागू राहणार आहे. पोलिसांनी हा आदेश ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करून जनतेपर्यंत पोचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.



