उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर : पूरग्रस्त ‌भागाची केली पाहणी

टीम AM  : गेवराई तालुक्यातील पूरग्रस्त भागाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पूरामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ‘या संकटसमयी शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं हक्काचं सरकार ठामपणे उभं आहे. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. शासन यंत्रणा तातडीने कामाला लागली असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल.’ पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं काम पवार यांनी केलं. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही या पाहणीवेळी उपस्थित होते.