टीम AM : राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागानं पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, पण आता राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
खरं तर, यंदा पावसाचं आगमन मे महिन्यातच झालं होतं. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. तसेच, राज्यातील अनेक ठिकाणी अपेक्षित पाणी साठा होण्यासही मदत झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. पण आता, हवामान विभागानं राज्यातील पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र, काल शनिवारपासून (13 सप्टेंबर) राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात रविवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागात छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



