टीम AM : मांजरा धरणाचे आज तब्बल सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण परिसरातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे.
दरम्यान, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, तसेच पूल, बंधारे व धोकादायक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे.



